Sanjivani Agro And Pipe #
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
 

रिसर्च 

कंपनी येणार्‍या खरीप  हंगामाच्या म्हणजे खरीप २०१५ च्या अनुसंगाने काही नवीन उत्पादनावर संशोधन करत आहे. तसेच दरवर्षी त्या वर्षातील उत्पादनाचा मार्केट मधला आढावा घेऊन त्यातल्या कमतरता शोधण्यात येतील व येणार्‍या नवीन हंगामात त्यावर नवीन संशोधन करून ते उत्पादन नवीन स्वरुपात अधिक गुणवत्ता देण्यासाठी बनवण्यात येईल जेणे करून शेतकरी बांधवाना त्याची फार मदत होईल.
 
  कंपनी चे रीसर्च डिपार्टमेंट हे सतत नवीन गोष्टींचा शोध घेत आहे . त्या मधे सर्व प्रकारच्या खतांचा आपल्या उत्पादनात समावेश करत आहोत आणि लवकरात लवकर उत्कृष्ट व दर्जेदार उत्पादने पुरवण्याचे आम्ही सर्व परी प्रयत्न करीत आहोत. कंपनी कडे प्रशस्त व परिपूर्ण अशी प्रयोग शाळा उपलब्ध असून त्यात सर्व तपासणी व संशोधन करण्या साठी आवश्यक अश्या मशिनरींची उपलब्धता आहे. त्यात सुरुवात म्हणून शेतकरी बांधवांच्या शेतातील माती व पाणी परीक्षणा पासून सुरुवात करण्यात येते. कंपनी शेतकर्यांच्या संपर्कात येऊन त्यांच्या शेतातील माती व पाण्याचे नमुने घेऊन ते आपल्या प्रयोग शाळेत तपासणी करून त्यातील कमतरता शोधते व त्या अनुसंगाने त्यावर आधारित आपल्या उत्पादकांचा वापर कसा करावा याची माहिती देते व त्यांचे उत्पादन कश्या प्रकारे वाढवण्यात येईल याचा सर्वोपरी प्रयत्न आम्ही करीत आहोत.
   
  यात विपणन ( मार्केटिंग ) विभागाचे प्रतिनिधी व संशोधन विभागाचे अधिकारी मदत करतात. जेणे करून शेतकरी बांधवांची माती व पाणी अल्प दारात तपासणी करून सर्व खतांचे नियोजन करून शेतकर्यांचा कमीतकमी खर्चात अधिक उत्पादनांचा ध्यास कंपनी घेते.
 
 २०१५ साठी कंपनीने आणलेले उत्पादन हे खालील प्रमाणे असतील.
 

१) धरती संजीवनी जैविक सेंद्रिय खत
२) कॅलग्रीन ( दानेदार ) १०:५:१०
३) कॅलमॅग ( दानेदार ) १०:५:१०
४) धनलक्ष्मी ( मायक्रो न्यूट्रियीयंट )
५) ह्यूमिसन 98%
६) ह्युमझाईम
७) अमृत संजीवनी ( ह्यूमिक १५% )
८) हरित संजीवनी ( माइक्रोन्यूट्रियीयंट ग्रेड २ )
९) साई फ्लोरा ( नायट्रोबेन्झिन २०% )

 
   तसेच सेंद्रीय खत जे धरती संजीवनी या नावाने प्रचलित आहे हे दाणेदार स्वरुपात उपलब्ध करण्याचा विचार सुद्धा कंपनीने केला आहे. 
या सर्व संशोधनाची माहिती दरवेळी या संकेत स्थळावर आपणास उपलब्ध होत राहील. तसेच काही कारणास्तव संपर्क करण्याचे असल्यास 
आपण संपर्क करू शकतात.

Login Form

Address

Mfg. & Mkt By: 

Sanjivani Agro Industries
&
Sanjivani Pipe Industries.
Gat No 70 / 1, Bhod Khu. Shivar Pimpri Dharangaon Road,Dist- Jalgaon.( MS )
 
Landline No - 02588-287290.
Mobile No - +91- 9764278397.7588815970

,

FOR NASHIK DISTRICT

Mobile No - +91- 9822353746